वाढणी: ४ ते ५ (५ ते ६ इंचाचे)
साहित्य:
१ कप बारीक चिरलेली मेथी
१/२ कप कणिक
२ टेस्पून दही
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून ओवा
१ टिस्पून जिरेपूड
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
थोडेसे तेल
चवीपुरते मिठ
कृती:
१) एका भांड्यात चिरलेली मेथी आणि साधारण १/२ टिस्पून मिठ घालून किंचीत कुस्करून घ्यावी. १५-२० मिनीटे झाकून ठेवावे. थोड्यावेळात मेथीला किंचीत पाणी सुटेल.
२) मेथीमध्ये जिरे, ओवा, जिरेपूड, हळद, लाल तिखट, हिरव्या मिरच्या घालावे आणि मिक्स करावे. कणिक, किंचीत मिठ आणि दही घालून मळून घ्यावे. अजून दही लागणार नाही पण जर पिठ घट्ट झाले तर किंचीत दही घालून मळावे, पाणी वापरू नये. मळलेले पिठ १/२ तास झाकून ठेवावे.
३) १/२ तासाने पिठ एकदा परत मळून घ्यावे आणि ४ ते ५ गोळे करून घ्यावे. तवा गरम करावा. पोळ्या करतो तसे लाटून घ्यावे. थोडे तेल घालून दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
गरम गरम थेपला चटणीबरोबर सर्व्ह करावा.
Labels:
Methi Thepla, Fenugreek Roti, Fenugreek Thepla
0 comments:
Post a Comment