कांद्याच्या या भज्यांना खेकडा भजी म्हणतात. बेसनाचे प्रमाण कमी असल्याने कांदा छान तळला जातो आणि त्यामुळे भज्यांना खेकड्यासारखे पाय असल्यासारखे वाटतात.
साधारण ३ प्लेट
वेळ: ४५ मिनीटे
Tips 4 Kitchen: Cut Onion without tears
साहित्य:
२ मध्यम कांदे
१/४ टिस्पून हिंग
१/२ टिस्पून हळद
२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून जिरे
१/४ कप कोथिंबीर,बारीक चिरून
बेसन साधारण १/४ ते १/२ कप
१ टेस्पून तांदूळ पिठ
चवीपुरते मिठ
५ ते ६ कढीपत्ता पाने (ऐच्छिक)
१/४ टिस्पून किसलेले आले (ऐच्छिक)
तळण्यासाठी तेल
कृती:
१) कांद्याचे पातळ उभे स्लाईस करावेत. त्यात हळद, लाल तिखट, हिंग आणि मिठ असे मिक्स करावे आणि १/२ तास झाकून ठेवून द्यावे. यामुळे कांद्याला थोडे पाणी सुटेल.
२) कांद्याला पाणी सुटले कि त्यात १ चमचा तांदूळ पिठ घालावे आणि साधारण ४ ते ५ टेस्पून बेसन घालावे. व्यवस्थित मिक्स करावे. यामध्ये अधिकचे पाणी अजिबात घालू नये, कांद्याला सुटलेल्या पाण्यातच पिठ घट्टसर भिजवावे. तसेच खुप जास्त बेसनसुद्धा घालू नये, थोडा कांदा दिसला तरी चालेल.
३) नंतर यात कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता चिरून, आले असे घालून मिक्स करावे. फायनल चव पाहून गरजेनुसार जिन्नस घालावेत.
४) तेल गरम करून त्यात भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे भाग मोकळे मोकळे करून तेलात सोडावेत. भजी खमंग तळून घ्यावीत. गरमागरम भजी चटणीबरोबर खावी.
टीप:
१) भजीच्या पिठात अधिकचे पाणी घातले तर भजी अजिबात कुरकूरीत होत नाहीत आणि चांगली लागत नाही.
Labels:
kanda bhaji, onion bajji, onion pakoda
0 comments:
Post a Comment