वाढणी: २ जणांसाठी
वेळ: ३५ मिनीटे
३/४ कप तांदूळ (बासमती)
५० ग्राम नुडल्स
१/४ कप गाजराचे लहान चौकोनी तुकडे
१/४ कप भोपळी मिरची, लहान चौकोनी तुकडे
१/४ कप वाटाणे
१/४ कप कांदा, उभा पातळ चिरून
१ पाती कांद्याची काडी, बारीक चिरून (हिरवा भाग सजावटीसाठी)
१ इंच आले, किसून
५ ते ६ लसूण पाकळ्या, ठेचून
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ टिस्पून सोयासॉस
१ टिस्पून व्हिनेगर
१/४ टिस्पून मिरपूड
१ टिस्पून साखर
१ टेस्पून करी पावडर (मी मद्रास करी पावडर वापरली होती)
२ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ
कृती:
१) तांदूळ धुवून घ्यावा आणि १५ मिनीटे निथळत ठेवावा. पातेल्यात साधारण ४ कप पाणी उकळावे त्यात १ टिस्पून मिठ घालावे. पाणी उकळायला लागले कि धुतलेला तांदूळ त्यात घालून मोठ्या आचेवरच तांदूळ ९० % शिजेस्तोवर उकळू द्यावे. तांदूळ शिजला कि चाळणीत ओतून त्यातील पाणी काढून टाकावे आणि हलकेच गार पाणी सोडावे. भात तसाच चाळणीत निथळत ठेवावा.
२) नूडल्स हाताने थोड्या क्रश करून घ्याव्यात, साधारण १ ते २ इंचाचे तुकडे करावेत. २ ते ३ कप पाणी उकळण्यास ठेवावे. नूडल्स पाकिटावरील सुचना वाचून नुडल्स शिजवाव्यात. शिजलेल्या नुडल्स गाळून घ्याव्यात.
३) पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कांदा साधारण २० ते ३० सेकंद परतावा. नंतर त्यात गाजर घालून मिनीटभर परतावे. त्यात भोपळी मिरचीचे तुकडे घालून साधारण ३० सेकंद परतावे. लगेच पातीकांदा घालून थोडावेळ परतावे.
४) परतलेल्या भाज्यांमध्ये १ टेस्पून तेल घालून गरम होवू द्यावे. त्यात करी पावडर घालून ढवळावे. निट मिक्स करावे. आता भात, सोयासॉस, मिरपूड, व्हिनेगर, आणि साखर घालून मिक्स करावे. भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी. नंतर शिजलेल्या नूडल्सही घालाव्यात. लागल्यास थोडे मिठ घालावे. भाज्या आणि मसाला भाताला सर्व ठिकाणी लागेल अशाप्रकारे मिक्स करावे.
पातीकांद्याने सजवावे आणि गरमागरम सर्व्ह करावे.
Labels:
Singapore fried Rice, Singapore Noodles rice, Asian Rice recipes
0 comments:
Post a Comment