३ ते ४ जणांसाठी
वेळ: ६० मिनीटे
४ लहान वांगी (जांभळी)
४ लहान बटाटे
३ लहान कांदे
३ टेस्पून तेल
चिमूटभर हिंग
१/४ टिस्पून बडीशोप
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ ते ३ टेस्पून बारीक चिरलेली मेथीची पाने (ऐच्छिक)
सारण
१ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
३/४ कप ताजा खोवलेला नारळ
२ टिस्पून धणेपूड
३ टिस्पून जिरेपूड
दिड टिस्पून लाल तिखट
३ टिस्पून साखर
१ टिस्पून गरम मसाला
१ टेस्पून दाण्याचा कूट
चवीपुरते मिठ
कृती:
१) सारणासाठी दिलेल्या सर्व जिन्नस एकत्र वाटून घ्यावे. गरज वाटल्यास अगदी थोडे पाणी घालून घट्टसर वाटण बनवावे. किंचीत चव पाहून गरजेचे साहित्य घालावे आणि चव ठीक करावी.
२) वांग्याची देठ कापून घ्यावी म्हणजे बेस तयार होईल. भरली वांग्यांना कापतो तशी अधिक चिन्हात चिर द्यावी. आणि गार पाण्यात ठेवून द्यावीत.
३) बटाटे सोलून त्यांनाही तशीच चिर द्यावी आणि पाण्यात घालून ठेवावे.
४) कांदे सोलून त्यांनाही अशीच चिर द्यावी.
५) भाज्यांमधील पाणी काढून स्वच्छ कपड्याने थोड्या पुसून घ्याव्यात. त्यामध्ये अलगदपणे सारण भरावे. जर तुम्हाला बटाट्याच्या आत सारण भरता नाही आले तरी हरकत नाही, बटाट्याला वरून सारणाचे कोटींग करावे. कांदेही स्टफ करावे.
६) कढईत तेल तापवावे. त्यात हिंग, बडीशोप, आणि कांदा घालून परतावे.
७) कांदा चांगला परतला गेला कि त्यात मेथीची चिरलेली पाने घालावी. दोन तीन मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
८) आता भरलेल्या भाज्या घालाव्यात. हलक्या हाताने भाज्या परताव्यात म्हणजे तेलाचे कोटींग भाज्यांना सर्वत्र लागेल. झाकण ठेवून अगदी लहान आचेवर भाज्या शिजू द्यात. मधेमधे हलक्या हाताने ढवळावे.
९) १० ते १२ मिनीटांनी उरलेले सारण आणि १/२ कप पाणी घालावे. ढवळून परत मध्यम आचेवर, कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी.
वांगं शिजायला अजून किमान २५ ते ३० मिनीटे लागतील. तरीही ५ ते ७ मिनीटांनी झाकण काढून भाज्या शिजल्या आहेत कि नाही ते चेक करावे.
भाजी तयार झाली कि पोळीबरोबर सर्व्ह करावी.
Labels:
Stuffed vegetable, bharli vangi, bharlele batate
0 comments:
Post a Comment