Pages

Showing posts with label Patthya. Show all posts
Showing posts with label Patthya. Show all posts

दलिया इडली - Daliya idli

Daliya Idli in English

वेळ: पूर्वतयारी- २० मिनीटे (दलिया भिजवणे वगळून) । पाकृसाठी- ३५ ते ४० मिनीटे
नग: १५ ते १७ मध्यम इडल्या

daliya idli, daliya recipe, daliya sheera, dalia idli recipe, marathi breakfast, indian breakfast recipe, healthy breakfastसाहित्य:
१ कप दलिया रवा
२ कप गरम पाणी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, २ हिरव्या मिरच्या
४ ते ५ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/२ टिस्पून उडीद डाळ, १/२ टिस्पून चणाडाळ
१ टिस्पून किसलेले आले
१/२ कप आंबट दही
चवीपुरते मिठ
१ टिस्पून इनो सोडा
इडली स्टॅंड
इडल्या वाफवायला इडली कूकर किंवा साधा मोठा कूकर

कृती:
१) दलिया गरम पाण्यात ४ तास भिजत घालावा. दलिया भिजल्यानंतर त्यातील अधिकचे पाणी काढून ठेवावे, पुर्ण पाणी काढले नाही तरी चालेल (टीप १). पाणी काढलेला दलिया मिक्सरमध्ये मध्यम वाटून घ्यावा.
२) कढल्यात तेल गरम करावे. त्यात आधी डाळी घालून गुलाबी होईस्तोवर परताव्या. नंतर मोहोरी, हिंग, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हि फोडणी वाटलेल्या दलियामध्ये घालावी.
३) यामध्ये दही, किसलेले आले आणि मिठ घालून मिक्स करावे. मिश्रण तांदूळाच्या इडलीसाठी जे मिश्रण असते तितपतच दाट असावे. लागल्यास दलिया भिजवून जे पाणी ठेवले होते ते घालावे.
४) कूकरमध्ये तळाला अडीच ते ३ इंच पातळीपर्यंत पाणी घालावे. गॅस सुरू करावा. इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्यावा.
५) मिश्रणाचे दोन भाग करावे (टीप ६). एका भागात १/२ टिस्पून सोडा घालावा. मिक्स करून इडली पात्रात भरावे.
६) कूकरमधील पाण्याला उकळी आली कि इडली स्टॅंड कूकरमध्ये ठेवावा. वरून झाकण लावावे. साधा कूकर वापरत असाल तर झाकणावरची शिट्टी काढून ठेवावी.
७) १२ ते १५ मिनीटे वाफवावे. गॅस बंद करून ७-८ मिनीटे वाफ जिरू द्यावी.
८) नंतर इडल्या चमच्याने काढाव्यात (टीप २). परत कूकरमध्ये पाणी गरम करून वरीलप्रमाणेच इडल्यांची दुसरी बॅच करावी.

टीप:
१) दलिया भिजवल्यावर जर जास्त पाणी उरले तर ते फेकून न देता सांबार बनवायला वापरावे. मी वापरले होते, चवीत फरक पडत नाही.
२) या इडल्या अख्ख्या गव्हाच्या असल्याने थोड्या चिकट राहतात व जास्त फुलत नाही. म्हणून पूर्ण वाफ मुरल्यावरच इडल्या चमच्याने काढाव्यात. थंड झाल्या तरी मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकतो.
३) या इडल्या जरा सालट लागतात. म्हणून शक्यतो या इडल्या फक्त चटणीबरोबर खाऊ नयेत. जोडीला सांबारही बनवावे.
४) डायबेटीस पेशंट्स किंवा ज्यांना तांदूळ न खायचे पथ्य आहे त्यांच्यासाठी न्याहारीचा उत्तम उपाय.
५) यामध्ये आवडीनुसार भाज्याही घालू शकतो.
६) माझ्याकडे असलेला इडली स्टॅंड लहान आहे आणि त्यात नऊच इडल्या होतात. तुमच्याकडे जर १२ किंवा १६ कप्प्यांचा स्टॅंड असेल तर एकाच वेळी तुम्ही सर्व इडल्या करू शकता.

आमसुलाचे सार - Amsool Saar

Amsool Saar (English version)

आमसुल पित्तशामक, पाचक तसेच भूक वाढवणारे असते. म्हणून आमसुलाचे सार जेवणाच्या आधी सूप म्हणूनही पिता येते.
आजारपणात आमसुलाचं सार प्यायल्याने तोंडाला चव येते.

konkani recipe, amsool sar, kokum kadhi, indian recipe, kokum grocery, indian store grocery and foods
वाढणी: साधारण २ कप

साहित्य
:

५-६ आमसुलं
२ टिस्पून गूळ
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
चिमूटभर हिंग
१ हिरवी मिरची बारीक चिरून
१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
दोन कप पाणी
चवीनुसार मिठ

कृती:
१) आमसुलं १/२ कप गरम पाण्यात १ तासभर भिजत घालावीत. नंतर आमसुलं त्या पाण्यात कुस्करून घ्यावी, म्हणजे आमसुलाचा अर्क पाण्यात उतरेल. हे पाणी गाळून घ्यावे। उरलेली आमसुले टाकून देऊ नयेत, त्या आमसुलांची चटणी बनवता येते.
२) या आमसुलाच्या पाण्यात दिड-दोन कप पाणी वाढवावे आणि पातेल्यात घेऊन गरम करत ठेवावे. छोट्या कढल्यात १ टिस्पून तूप गरम करावे. त्यात जिरे, हिंग, मिरचीची फोडणी करावी. हि फोडणी, गरम करत ठेवलेल्या आमसुलाच्या पाण्यात घालावी. मिठ घालावे. २ टिस्पून गूळ घालावा. कोथिंबीर घालून थोडे गरम करून गरम गरम सर्व्ह करावे.

Labels:
Kokum Saar, Amsool sar, kokum, kokum curry, kokum kadhi, kokum recipe, Maharashtrian Recipe

टोमॅटो सूप / सार - Tomato Soup

Tomato Soup (English Version)

Tomato Soup, Tomato Soup Recipe, Tomato Recipe, Tomato saar, healthy soup recipe, vegetarian soup recipe, veggie soup recipe
साहित्य:
१/२ किलो टोमॅटो
१ चमचा तांदूळ पिठ
२ तमालपत्र
१ लहान चमचा जिरं
१/२ चमचा जिरपूड
१ चमचा तिखट
१ चमचा तूप
हिंग
दिड चमचा साखर
चवीपुरते मिठ
कोथिंबीर

कृती:
१) टोमॅटो कूकरमध्ये शिजवून घ्यावेत(कूकरमध्ये ३ शिट्ट्या कराव्यात). थंड झाले कि त्याची साले काढावीत.
२) तांदूळ पिठ १/२ वाटी पाण्यात गुठळ्या न होत्या कालवून घ्यावे.
३) थंड झालेल्या टोमॅटोचा देठाकडचा भाग काढून टोमॅटो मिक्सरमध्ये घालावेत त्यातच कालवलेले तांदूळपिठ, तिखट, साखर, मीठ घालावे, आणि सर्व एकत्र करून मिक्सरवर वाटून घ्यावे. हे करताना जास्तीचे पाणी घालू नये. मिश्रण मिक्सरवर फिरवल्यावर आवश्यक तेवढे पाणी घालावे.
४) ही टोमॅटोची पातळसर प्युरी चाळणीवर गाळून घ्यावी, म्हणजे टोमॅटो सूपमध्ये कसल्याच गुठळ्या, बिया राहणार नाहीत. गाळलेल्या रसात १/२ चमचा जिरपूड, २ तमालपत्र घालावे. गाळलेले मिश्रण उकळण्यासाठी पातेल्यात काढून घ्यावा.
५) लहान कढल्यात / लोखंडी पळीत १ चमचा तूप गरम करावे. जिरे, हिंग घालून फोडणी करावी. वरून टोमॅटो सूपला फोडणी द्यावी आणि थोडावेळ उकळावे. कोथिंबीर घालावी.

टीप:
१) टोमॅटो कूकरमध्ये शिजवताना थोडे जिरे घातल्यास जिर्याचा वास छान लागतो.
२) तमालपत्र फक्त उकळताना घातल्यास तमालपत्राचा उग्रपणा सूपाला लागणार नाही. जर तमालपत्र फोडणीत घातले तर त्याचा वास वरचढ होतो.
३) आवडत असल्यास वरून थोडे क्रिम घालू शकतो.
४) तांदूळपिठाऐवजी कॉर्न फ्लोरही वापरू शकतो.

मुगाळं - Mugale

Mugale in English

वाढणी: ३ जण
Indian spiced rice, rice recipes, restaurant style food, indian grocery, quick and easy
साहित्य:
१/२ कप तांदूळ
पाव कप मूगडाळ
१/४ टिस्पून हळद
चिमूटभर हिंग
मीठ
तूप

कृती:
१) कूकरच्या डब्यात तांदूळ आणि मूगडाळ एकत्र करून त्यात अडीचपट पाणी घालावे. त्यात हळद आणि हिंग घालावे. प्रेशर कूकर मध्ये ४-५ शिट्ट्या कराव्यात.
२) १० मिनिटांनी कूकरमधले शीजलेला भात आणि डाळ पातेल्यात काढून त्यात थोडे पाणी घालून भात हवा तेवढा पातळ करावा. रवीने भात एकजीव करून घ्यावा. चवीपुरते मीठ घालावे. गरम गरम खावा. खाताना लिंबाचे गोड लोणचे, दही, मेतकूट घ्यावे.

आजारपणात हलका आहार घ्यायला सांगतात. त्यासाठी हा पदार्थ उत्तम. मी आजारी असताना माझी आई मला हेच बनवून द्यायची. :-)

Labels:
healthy food, diet food, mugale, maubhat