Pages

Showing posts with label drink. Show all posts
Showing posts with label drink. Show all posts

लिंबाचे टिकाऊ सरबत - Limbu sarbat

Lemon Juice in English


वेळ: साधारण २५ मिनीटे
साधारण ३ कप लिंबाचे टिकाऊ सरबत (यातून साधारण २०-२२ जणांना लिंबाचे सरबत बनू शकेल)

homemade lemonade, limbache sarbat, gharguti limbache sarbat, summer drink, limbu sarbatसाहित्य:
१ कप लिंबाचा रस (साधारण १२ मोठी रसाची लिंबं)
अडीच कप साखर
३/४ कप पाणी
२ टिस्पून मिठ

कृती:
१) लिंबाचा रस गाळून घ्यावा म्हणजे बिया आणि लिंबाचा किंचीत राहिलेला गर निघून फक्त लिंबाचा रस उरेल.
२) अडीच कप साखर आणि ३/४ कप पाणी एका पातेल्यात एकत्र करावे. गोळीबंद पाक करावा (महत्त्वाची टिप).
३) पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. तयार पाकात लिंबाचा रस घालून ५ मिनीटे ढवळावे. नंतर जरा निवेस्तोवर अधूनमधून ढवळावे.
४) तयार लिंबू सरबत काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा.
लिंबाचे सरबत करताना १ ग्लासभर लिंबाचे सरबत बनवायचे असल्यास, एका ग्लासमध्ये २ मोठे चमचे लिंबाचा पाक घालावा, गार पाणी घालावे आणि मिक्स करावे. मिठाची गरज लागल्यास किंचीत मिठ घालावे. तसेच बर्फही घालू शकतो.

टीप:
१) लिंबाच्या सरबतात चिमूटभर वेलचीपूड घातली तरी छान फ्लेवर येतो.
२) गोळीबंद पाक म्हणजे पाकाचा थेंब गार पाण्यात टाकल्यावर टणक गोळी तयार झाला पाहिजे. पण लिंबू सरबताला मऊसर गोळी (Soft Ball Consistency) तयार झाली तरीही चालेल.

Labels:
Lemon Juice, Homemade Lemonade, limbu sarbat

कैरीचे पन्हं - Kairiche Panhe

Panhe (English version)

पन्हे बनविण्याच्या बर्‍याच पद्धती आहेत. खाली दिलेल्या पद्धतीत पन्ह्याचा तयार गर हा टिकाऊ असतो, ज्यामुळे गर बनवून फ्रिजमध्ये ठेवता येतो आणि गरजेनुसार पन्हे पिता येते.

Panhe,Panha,Kairi panha ,raw mango recipe,raw  mango sarbat,marathi kairi sarbat,indian style summar coolant,panhe recipe

साहित्य:
दिड कप कैरीचा गर (कृती क्र. १)
२ कप साखर
१ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर

कृती:
१) साधारण एक मोठी कैरी (साधारण १ ते दिड पौंड) कूकरमध्ये शिजवून घ्यावी. थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
२) साखर पातेल्यात घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी (साधारण १/२ ते पाउण कप)घालून गोळीबंद पाक करावा. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. त्यात केशर आणि वेलचीपूड घालावी, कैरीचा गर घालावा. ढवळून घ्यावे. मिश्रण थंड झाले कि काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
३) एक ग्लासमध्ये २-३ टेस्पून मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.

टीप:
१) सर्व्ह करताना किंचीत मिठ घातले तरी छान चव येते
२) शक्यतो कैरी आंबट असावी. जर कैरी आंबट नसेल तर त्याप्रमाणे साखर कमी करावी. तसेच कमी आंबट कैरीचे पन्हे पिताना थोडे लिंबू पिळावे.

Labels:
Panha, Raw mango drink, indian mango drink, panhe recipe, maharashtrian recipe

मसाला दुध - Masala Dudh

Masala Dudh (English version)

Masala dudh, Masala Doodh recipe, Marathi Recipe Masala Dudh, India Tradition, Kojagiri pournima, Desi Recipe, Desi Grocery

साहित्य:
२ कप दुध
३ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/४ कप बदामाची पूड
१ टेस्पून पिस्ता पूड
१/२ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर जायफळ पूड
१ चिमूटभर केशर

कृती:
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. बनवलेला २-३ टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) मसाला बनवताना इतरही सुकामेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.

Labels:
Masala Dudh, Masaala dudh, Massala Milk, Kojagiri, Badam Milk

मठ्ठा - Mattha

Mattha Spiced Buttermilk (English Version)

Mattha, Spiced Buttermilk, Maharashtrian Buttermilk, spicy buttermilk, Indian buttermilk recipe, low calorie diet

साहित्य:
१/२ कप दही
१ कप पाणी
१ टेस्पून कोथिंबीर
२ चिरलेली पुदीना पाने
१/४ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून किसलेले आले
चवीनुसार मिठ

कृती:
१) प्रथम दही रवीने घोटून घ्यावे. मग त्यात पाणी घालून घुसळून घ्यावे.
२) खलबत्त्यात घालून जिरे भरडसर कुटून घ्यावे. कुटलेले जिरे आणि किसलेले आले, घुसळलेल्या ताकात घालावे.
३) एका वाटीत १ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेली पुदीना पाने घ्यावीत. त्यात २ चिमटी मिठ घालून कुस्करून घ्यावे, म्हणजे मठ्ठा पिताना त्याची पाने तोंडात येणार नाहीत. हि कुस्करलेली कोथिंबीर व पुदीना पाने मठ्ठ्यात घालावी. चवीनुसार मिठ वाढवावे.
सर्व एकत्र ढवळून जेवणानंतर सर्व्ह करावे.

टीप:
१) किंचीत तिखटपणा हवा असेल तर अगदी चिमूटभर मिरचीची पेस्ट घालावी.

Labels:
Spiced Buttermilk, buttermilk recipes, Mattha recipe, how to make Mattha